मुंबई -एक दिव्यांश नाल्यात वाहून गेला असे अनेक दिव्यांश जाऊ शकतात. त्यामुळे पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरा, असे आवाहन दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ३ वर्षांचा दिव्यांश नाल्यामध्ये वाहून गेल्याचे तब्बल ४२ तास झाले असून अजुनही दिव्यांश सापडत नसल्यामुळे मुंबईकर संताप व्यक्त करत आहे.
'दिव्यांश' सापडेपर्यंत मुंबईकरांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन - shivsena
३ वर्षांचा दिव्यांश नाल्यामध्ये वाहून गेल्याचे तब्बल ४२ तास झाले असून अजुनही दिव्यांश सापडत नसल्यामुळे मुंबईकर संताप व्यक्त करत आहे.
आज दुपारी दिंडोशी पोलिसांनी दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. "आज कुठेही एनडीआरएफच्या पथकाची शोध मोहीम सुरू असल्याचे दिसले नाही. तसेच पोलिसांनी मला पत्रकार परिषद घेऊ दिली नाही." असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रवण तिवारी यांनी केला.
श्रवण तिवारी पुढे म्हणाले, "मुंबईच्या महापौरांनी गुरुवारी भेटी दरम्यान जे वक्तव्य केले यातून त्यांची या घटनेबद्दल असलेली संवेदनशीलता लक्षात येते. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि या घटनेत महापालिकेचे सर्व अधिकारी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावर कोणते भाष्य केलेले नाही. गोरेगावचे दोन्ही मंत्री सुभाष देसाई विद्या ठाकूर यांनी काहीच केलेले नाही. अशाप्रकारे प्रशासनाचे हे अपयश असून ढीसाळ कारभार असल्याचे दिसत आहे."