महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आता मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

msrtc employees salary ajit pawar decision
एसटी कर्मचारी वेतन बातमी

By

Published : Sep 2, 2021, 5:52 PM IST

Updated : Sep 2, 2021, 6:41 PM IST

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आता मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा -12 सदस्यांच्या नावांमध्ये अडचण आल्यास मुख्यमंत्री निर्णय घेतील - अजित पवार

महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटणार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसर तातडीने निधी वितरीत करण्यात आला. चालू आर्थिक वर्षासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. त्यानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला. निधी वितरीत झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

कोरोना महामारीत गेल्‍या वर्षी लॉकडाऊनमध्ये सार्वाजनिक वाहतूक व्‍यवस्‍था ठप्प झाली होती. अशात कोट्यवधींचे उत्‍पन्न अचानक बंद झाल्‍याने महामंडळ आर्थिक संकटात सापडले. गेल्‍या दीड वर्षात बहुतांश वेळा वेतनास विलंब होत असल्‍याने कर्मचाऱ्यांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त होत आहे. एसटीच्या ९७ हजार कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २९० कोटींची आवश्यकता असते. आज अखेर जुलै महिन्याचे वेतन मिळाले नाही. तसेच, ऑगस्ट महिनाही संपला असून ७ सप्टेंबरला ऑगस्ट महिन्याचे आणखी एक वेतन द्यावे लागणार आहे. त्यामुळे, एसटी महामंडळाला एकूण ५५०-६०० कोटींची आवश्यकता होती. त्यानुसार आज ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा -विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शलने केले 'असे' काही, पाहा व्हिडिओ

Last Updated : Sep 2, 2021, 6:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details