महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; सातारचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण गटातून राज्यातून प्रथम येण्याचा मान सातारच्या प्रसाद चौगुले यांनी मिळवला आहे. तर महिलांमधून अमरावतीच्या पर्वणी पाटील राज्यात प्रथम आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके यांनी मागास वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

mpsc exam results declered prasad chowgule first in state
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

By

Published : Jun 19, 2020, 7:16 PM IST

Updated : Jun 19, 2020, 8:21 PM IST

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण गटातून राज्यातून प्रथम येण्याचा मान सातारच्या प्रसाद चौगुले यांनी मिळवला आहे. तर महिलांमधून अमरावतीच्या पर्वणी पाटील राज्यात प्रथम आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके यांनी मागास वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हेही वाचा...मराठी पाऊल पडते पुढे...! महेश भागवतांची तेलंगाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मागील वर्षी 13 ते 15 जुलै 2019 या कालावधी दरम्यान घेण्यात आलेल्या 'राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019' चा निकाल आज (शुकर्वार) जाहीर करण्यात आला आहे. यात साताऱ्याचा प्रसाद चौगुलै यांने 566 गुण मिळवत उपजिल्हाधिकारी संवर्गात राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला. तर पोलीस उपअधिक्षक परीक्षेत चैतन्य कदम आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आहे. तर महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील हिने पहिला येण्याचा मान पटकावला आहे.

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; सातारचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, सहाय पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपकार्यकारी अधिकारी, सहायक संचालक, वित्त व लेखा, उद्योग संचालक, तहसिलदार नायब तहसिलदार आदी 17 संवर्गांतील 431 पदांसाठी परीक्षा घेतली होती. मात्र निकाल जाहीर केला जात नसल्याने विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागली होती.

हेही वाचा...'एमपीएससी'चे सुधारित वेळापत्रक जाहीर; युवक काँग्रेसकडून आयोगाच्या निर्णयाचे स्वागत

लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या निकालात सहायक राज्यकर आयुक्त परीक्षेत गौरव मंगीलाल भालाघाटिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उपमुख्यकार्यकारी अधिकारी संवर्गात अभिषेक कासोडे, सहायक संचालक वित्त व लेखा विभागमध्ये ज्ञानराज दहाडे, तहसिलदार संवर्गात ज्ञानेश्वर काकडे, उपशिक्षणाधिकारी संवर्गात राम फरतंडे, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क उपअधिक्षक पदासाठी आश्विनीकुकार माने, उद्योग अधिकारी संवर्गात भालचंद्र यादव आदीनी यश मिळवले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या निकालाची माहितीउमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.

Last Updated : Jun 19, 2020, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details