महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात 'किन्नर बोर्ड' स्थापन करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी - Kinner Board in maharashtra

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात किन्नर समाजाच्या प्रश्नांबाबत काम करण्यासाठी किन्नर बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली. मागील अनेक वर्षांपासून किन्नर समाजाच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहेत, याच पार्श्वभुमीवर त्यांनी किन्नर समाजाच्या बोर्डाची मागणी केली.

mp supriya sule
खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Jan 7, 2020, 8:19 PM IST

मुंबई -राज्यातील वेगवेगळ्या समस्या आणि नवीन उपक्रमाबाबत आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी मागील अनेक वर्षांपासून किन्नर समाजाच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहे, या पार्श्वभुमीवर किन्नर समाजाच्या बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली.

खासदार सुप्रिया सुळेंनी किन्नर बोर्ड स्थापन करण्याची केली मागणी...

हेही वाचा... 'सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन बिघडले आहे'

स्टार्की हिअरिंग फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई यांच्या माध्यमातून ८ तासात ४ हजार ८४६ कर्णबधिरांना श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रमी उपक्रम केला गेला होता. एका दिवसात सुमारे ६ हजार गरजूंना श्रवणयंत्रे वाटप केले गेले होते. याच श्रवणयंत्राचे वाटप राज्य पातळीवर व्हावे, अशी कल्पना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत मांडली. या बैठकीत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही शासनाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा... सरकारी बँकांची सेवा विस्कळित होण्याची शक्यता; उद्या कामगार संघटनांचा संप

दरम्यान, यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी किन्नर समाजाच्या प्रश्नांबाबतही एक विशेष बैठक बोलावली होती. ज्यात किन्नर समाजाचे शिष्टमंडळही हजर होते. मागील अनेक वर्षांपासून किन्नर समाजाच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहेत. किन्नर समाजाच्या बोर्डाची मागणी त्यात प्रामुख्याने होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ बोर्डाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी २० दिवसात किन्नर बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन दिले.

शिवाय राज्यातील एकल महिलांचा मुद्दाही खासदार सुळे यांनी आजच्या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी येत्या अर्थसंकल्पात एकल महिलांनाही भरीव मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details