महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut : 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही'; संजय राऊतांनी दिपाली सय्यदांना खडसावलं

उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे लवकरच एकत्र येणार असल्याचे विधान दिपाली सय्यद यांनी केलं होते. त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही. त्यामुळे विचारपूर्वक बोला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सय्यद यांना सुनावलं ( sanjay raut on dipali sayyed ) आहे.

sanjay raut dipali sayyed
sanjay raut dipali sayyed

By

Published : Jul 17, 2022, 4:42 PM IST

Updated : Jul 17, 2022, 5:02 PM IST

मुंबई -शिवसेनेचे 40 आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) झाले. मात्र, त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे लवकरच एकत्र येणार असल्याचे विधान शिवसेना नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद ( Dipali Sayyed ) यांनी केलं होते. त्यावरुन शिवसेनेच्या नेते, खासदार संजय राऊत ( Mp Sanjay Raut ) यांनी सय्यद यांचे कान टोचले आहेत. 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही. त्यामुळे विचारपूर्वक बोला,' अशा शब्दांत संजय राऊत यांनी सय्यदांना खडसावलं ( sanjay raut on dipali sayyed ) आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत गळती सुरू झाली आहे. शिवसेना पक्षातील गटबाजी दूर व्हावी, यासाठी दिपाली सय्यद या प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची सय्यद यांनी नुकतीच भेट घेतल्यानंतर दोघेही एकत्र आहेत. दोघांनाही एकत्र आणण्यासाठी भाजपने पुढाकार घेतल्याचे सय्यद यांनी म्हटले होते. त्यावरुन राऊत यांनी दिपाली सय्यद यांना सुनावलं आहे.

'असे वक्तव्य करण्याचे अधिकार त्यांना...' - संजय राऊत म्हणाले की, त्या अभिनेत्री आहेत. आमच्या पक्षात काम करतात. शिवसेनेच्या त्या नेत्या नाहीत. शिवसेनेच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ता असतील. परंतु, अशा प्रकारची वक्तव्य करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. त्या प्रकारचे वक्तव्य नेतेच करू शकतात. त्यामुळे असे वक्तव्य करण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले हे मला माहीत नाही, अशा शब्दात राऊत यांनी दिपाली सय्यद यांना खडसावले.

ठाकरे आणि शिंदे एकत्र यावे असं वाटत नाही का? -या प्रश्नावर राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 'गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. ते आमचे सहकारी, मित्र आहेत. त्यांचे आणि आमचे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध आहेत आणि राहतील. ते आता टीका करत असले तरी सुद्धा गेल्या अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये भागीदार होतो. त्यांच्यासाठी मी भांडलो आहे. आमच्यावर टीका करणे, ही त्यांची मजबुरी आहे. भाजप त्यांच्या मुखातून आमच्या वरती टीका करत आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला.

दिपाली सय्यद यांची सारवासारव -संजय राऊत यांनी खडसावल्यानंतर दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका मांडली आहे. 'पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे ही सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. मी देखील एक सामान्य शिवसैनिक असून मला जे वाटलं, जाणवलं ते मी बोलले,' असे सांगत सारवा सराव करण्याचा प्रयत्न केला. तसेच, शिंदे यांनी मला राजकारणात जरी आणले असले तरी, मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम राहणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले.

दीपाली सय्यद यांचे ट्विट -येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थिकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शनिवारी रात्री ( 16 जुलै ) केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार का हे पहाव लागेल.

हेही वाचा -Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

Last Updated : Jul 17, 2022, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details