मुंबईशिवसेनाखासदार संजय राऊत यांना ईडीने पत्रा घोटाळा प्रकरणी अटक केली होती. यात आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीवर सुनावणी Sanjay Raut judicial custody extended पार पडली. राऊतांच्या कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत Shiv Sena leader Sanjay Rautयांना आज जामीन मिळणार की कोठडी ? याचा आज फैसला होणार होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणीPatra Chawl land scam case ईडीच्या अटकेत असलेल्या राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपली होती, पण न्यायालयाने कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यांना आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले Bombay Sessions Court होते.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा Patra Chawl land scam case प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. आज कोठडी संपणार असल्याने त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात येणार होते. त्यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम वाढणार की, त्यांना बेल मिळणार ? यावर आज काय निर्णय होणार होता. याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या श्रद्धा डेव्हलपर्स वर मागील आठवड्यात ईडी कडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्यसह अनेक कागदपत्र देखील ईडीने जप्त केले. संजय राऊत ज्या दोन मर्सिडीज गाडी वापरत होते, त्या मर्सिडीज गाडी श्रद्धा डेव्हलपरच्या नावाने असल्याचे देखील म्हटले जात आहे.
प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते ?पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांची ईडी कोठडी 4 ऑगस्ट रोजी संपत आहे. ईडीने राऊतांना 31 जुलैला रात्री उशिरा भांडुपच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली होती. या प्रकरणी ईडीने असा दावा केला होता की संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते. खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर जामीन मिळाला, तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात. तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात. याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी ? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी Sanjay Raut and Patra Chawl land scam संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं, आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो, की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं आहे. या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
सुजित पाटकर याचाही संजय राऊतांशी संबंधईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती. MP Sanjay Raut judicial custody extended till September 19
हेही वाचाPatrachal Land Scam : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरण; लवकरात लवकर भाडे देण्याची रहिवाशांची मागणी