मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच दहा वर्षाखालील लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या समस्येकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन तज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. लहान मुलांकरता पीडियाट्रिक कोरोना वॉर्ड किंवा हॉस्पिटलची निर्मिती करा अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे केली आहे.
लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड उभारा - राहुल शेवाळे - coronavirus update
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच दहा वर्षाखालील लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या समस्येकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन तज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक
1 मे पासून संपूर्ण देशभरामध्ये तरुण वर्गाला लसीकरणाची सुविधा देण्यात आलेली आहे. 18 वर्षावरील तरुणांना ही लस देण्यात येणार आहे. परंतु 18 वर्षाखालील जी लहान मुलं आहेत त्यांचं काय? 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा वाढता धोका हा लहान मुलांना येत्या काळात होणार आहे. याकडे लक्ष देऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योग्य त्या उपाययोजना करत लहान मुलांसाठी पीडियाट्रिक हॉस्पिटलची निर्मिती करावी अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
लवकर पावले उचलण्याची गरज
लहान मुलांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन देशातील तज्ञ,डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड केअर सेंटर,ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य करावे अशी मागणी देखील या वेळेस राहुल शेवाळे यांनी केली आहे. लसीकरणासंदर्भातील मिस मॅनेजमेंटला केंद्र सरकार कारणीभूत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार बरोबर दुजाभाव करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.