मुंबई- सांताक्रूझमधील वाकोला येथे विजेचा धक्का बसल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू; सांताक्रूझ मधील घटना - v n desai hospital wakola
सांताक्रूझमधील वाकोला येथे विजेचा धक्का बसल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सांताक्रूझमधील वाकोला येथे विजेचा धक्का बसल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल नगर येथे घराच्या वीज मीटरमुळे दोन व्यक्तींना शॉक लागला. त्यांना तातडीने व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
माला नगम (वयोवर्ष 50) व संकेत नगम (वय 22) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.