महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लालबागच्या मिरवणुकीमध्ये 50 हून अधिक गणेश भक्तांचे मोबाईल चोरीला गेल्याची नोंद - गर्दीचा फायदा घेत चोरी

22 तासाच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गणेश भक्तांचे 50 हून अधिक मोबाईल चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. तसेच अनेक सोन्याचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केले आहेत. इतर ठिकाणीही असे प्रकार झाल्याचे लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे.

लालबागच्या मिरवणुकीमध्ये 50 हून अधिक गणेश भक्तांचे मोबाईल चोरीला
लालबागच्या मिरवणुकीमध्ये 50 हून अधिक गणेश भक्तांचे मोबाईल चोरीला

By

Published : Sep 10, 2022, 3:11 PM IST

मुंबई -दोन वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यावर्षी कुठलेही निर्बंध नसताना मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला. 22 तासाच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गणेश भक्तांचे 50 अधिक मोबाईल चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. तसेच अनेक सोन्याचे दागिने देखील चोरट्यांनी लंपास केले आहेत.

गर्दीचा फायदा घेत चोरी - अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबाग-परळ भागातून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल 50 मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने लंपास केले. गणपती मिरवणुकीत चोरीला गेलेल्या सामानाची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांनी गर्दी केली.



दोन वर्षानंतर विसर्जन मिरवणूक - राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. मुंबई पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. तर मुंबईतील लागलबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी देखील त्यांचे हात चांगलेच साफ करून घेतले आहेत.

इतरही चोरींची शक्यता - लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तु चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती. मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. चोरीच्या तक्रारींचा लालबाग परिसरातील व्यक्तींचा आकडा समोर आला आहे. राज्यासह संपूर्ण मुंबईत बाप्पाच्या मिरवणुका या धुमधडाक्यात सुरू होत्या. त्यामुळे इतर ठिकाणीही असे प्रकार झाल्याचे लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details