मुंबई -राज्यात कोरोनाचा उद्रेक ( Corona Patient Increased In Maharashtra ) दिवसेंदिवस वाढतो आहे. आज 24 तासामध्ये सुमारे 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद ( Maharashtra todays Corona Patient ) झाली आहे. 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर दिवसभरात 9 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुसरीकडे ओमायक्रोनचा प्रसार ( Omicron In Maharashtra ) देखील वाढला असून आज 133 रुग्ण राज्यभरात आढळून आले. सक्रिय रुग्ण देखील दीड लाखाच्या ( Active Corona Patient in Maharashtra ) घरात असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
आज 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद -
मागील दहा दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण राज्यभरात सापडत आहेत. गेल्या तीन दिवसांत भरमसाठ रुग्णवाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद झाली. राज्यात यामुळे 68 लाख 75 हजार 753 इतकी आहे. तर 9 हजार 671 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 57 हजार 81 इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 95.37 टक्के इतका आहे. दिवसभरात 13 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.5 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 3 लाख 42 हजार 173 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 8 लाख 45 हजार 89 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1851 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 1 लाख 73 हजार 238 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आज 133 ओमायक्रॉन बाधित -