मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा मुंबई हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईत गुरुवारी 27 मे पर्यंत 33835 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यापैकी जी नॉर्थ, ‘ई’, एफ नॉर्थ, एल, एच ईस्ट, के वेस्ट या 6 विभागामध्ये प्रत्येकी 2 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. इतर 9 विभागात प्रत्येकी 2 हजारच्या खाली तर 9 वॉर्डमध्ये प्रत्येकी एक हजाराहून कमी रुग्ण असल्याची आकडेवारी पालिकेने प्रसिद्ध केली आहे.
मुंबई महापालिकेच्या 'या' 6 विभागात कोरोनाचे 2 हजारांहून अधिक रुग्ण - मुंबई कोरोना वार्ड न्यूज
मुंबईत कोरोनाचे रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गुरुवारी 27 मे पर्यंत कोरोनाच्या 33835 एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामधील 9054 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाचे रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गुरुवारी 27 मे पर्यंत कोरोनाच्या 33835 एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामधील 9054 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे कामकाज 24 विभाग कार्यालयामार्फत चालवले जाते. पालिकेने दिलेल्या आकडेवारी नुसार दादर-माहिम-धारावी या जी नॉर्थ, भायखळा, नागपाडा या ‘ई’ विभागात, शीव-अँटॉप हिल एफ नॉर्थ, एल, वांद्रे सांताक्रुझ पूर्व या एच ईस्ट, अंधेरी पश्चिम विलेपार्ले जोगेश्वरी पश्चिम के वेस्ट या 6 विभागामध्ये 2 हजाराहून अधिक रुग्ण आहेत.