मुंबई : महाराष्ट्राच्या दृष्टीने गुवाहाटीमध्ये संध्याकाळी पाच वाजता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य वेधले आहे. कारण आज सकाळी देखील महाराष्ट्रातून सुरतममध्ये पाच आमदार दाखल झाले आहे. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या बैठकी विशेष महत्व प्रप्त झाले आहे. सकाळी पहिल्यांदा योगेश कदम यांच्यासह 3 आमदार गुजरात दाखल झाले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे आणखी 2 आमदार सुरतला पोहोचले ( Shiv Sena Two MLAs reach Gujarat ), आणखी एक आमदार येणार आहे. शिवसेनेचे आमदार सोमवारी रात्री अचानक सुरतमध्ये दाखल झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या सरकारची तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 30 आमदारांनी सुरतमधील हॉटेलमध्ये तळ ठोकला होता.
राजकीय गदारोळ : मंगळवारी सायंकाळपर्यंत राजकीय गोंधळ सुरूच होता. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये येऊन एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्यासह अन्य आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर तो सुरतहून आसाममधील गुवाहाटीला गेला. या वातावरणात आणखी दोन आमदार मुंबईहून सुरतला पोहोचल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मंत्रिमंडळाची बैठक तातडीने बोलावली होती. ज्यामध्ये शिवेसेना पक्षाचा फक्त एक मंत्री उपस्थित होता.