महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Monsoon Session of Legislature विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते 25 ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session of Legislature ) बुधवार दिनांक १७ ऑगस्टपासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून, विधानसभा ( Vidhan Bhavan Mumbai ), आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या.

Monsoon Session of Legislature
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

By

Published : Aug 11, 2022, 3:21 PM IST

मुंबई :राज्याचे२०२२ चे पावसाळी अधिवेशन ( 2022 Monsoon Session ) बुधवार दिनांक १७ ऑगस्टपासून विधान भवन ( Vidhan Bhavan, Mumbai ), मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून, विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ ( Meetings of Legislative Assembly ) कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या.

अनेक मान्यवर उपस्थित यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.


पावसाळी अधिवेशवन तात्पुरते दिनदर्शिकेवर दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून, यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुटी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : Sanjay Rathod Cleancheat Report संजय राठोड यांचा क्लीनचिट अहवाल आला समोर

ABOUT THE AUTHOR

...view details