महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray on Ketaki Chitale : राज्यातली परंपरा खालच्या पातळीवर येऊ नये, राज ठाकरेंचा चितळेच्या पोस्टवर इशारा - mumbai ncp sharad pawar news

पोस्ट लिहिणारी व्यक्ती खरंच आहे का कारण अशा पद्धतीने महाराष्ट्रात विकृती पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांचा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाचा नीट छडा लावावा आणि संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी ही राज ठाकरेंनी पत्रात केली ( Raj Thackeray on Ketaki Chitale ) आहे.

mns raj thackeray  criticize actress ketki chitle for facebook post on sharad pawar
राज ठाकरेंचा केतकी चितळेच्या पोस्टवर इशारा

By

Published : May 14, 2022, 9:18 PM IST

Updated : May 14, 2022, 10:07 PM IST

मुंबई -महाराष्ट्रामध्ये नेहमी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात अनेकदा टीका केली जाते. मात्र, ती कधीही खालच्या पातळीची ही नसते त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार नाही, असे काही करू नये, असा सज्जड दमच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिला ( Raj Thackeray on Ketaki Chitale ) आहे.

राज ठाकरेंचा केतकी चितळेच्या पोस्टवर इशारा
अशा पद्धतीची टीका कदापि सहन केली जाणार नाही - महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवार यांच्या विरोधात कोणीतरी केतकी चितळे नावाच्या व्यक्तीने अत्यंत खालच्या पातळीवर श्लोकाच्या भाषेत काहीतरी लिहिले आहे, असे आमचा निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि अशी भाषा परंपरेला साजेशी नाही. राजकीय व्यक्तींविरोधात अनेकदा टीका केली जाते. मात्र, ती विनोद बुद्धीतूनही केली जाते ती आपण समजू शकतो. मात्र, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात हीन पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही ही चूकच आहे. अशा पद्धतीने परंपरेला कुणीही खालच्या पातळीवर नेऊ नये, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिला आहे. केतकी चितळे या महिलेने शरद पवार यांच्या विरोधात फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलेल्या टीके बाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचे आणि त्यांचे मतभेद आहेत मात्र, अशा पद्धतीची टीका कदापि सहन केली जाणार नाही, असेही राज यांनी म्हटले आहे.पोस्ट लिहिणारी व्यक्ती खरंच आहे का - पोस्ट लिहिणारी व्यक्ती खरंच आहे का कारण अशा पद्धतीने महाराष्ट्रात विकृती पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांचा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाचा नीट छडा लावावा आणि संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी ही राज यांनी पत्रात केली आहे.
Last Updated : May 14, 2022, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details