महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Maharashtra Tour : आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्वाची बैठक, महाराष्ट्र दौऱ्याबाबत खलबत - राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 17 सप्टेंबरपासून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार ( Raj Thackeray Maharashtra tour ) आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांची खलबत्त सुरू झाली असून, मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेते व सरचिटणीसांची बैठक बोलवण्यात आलेली ( meeting of MNS in presence of Raj Thackeray ) आहे.

Raj Thackeray Maharashtra Tour
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्वाची बैठक

By

Published : Sep 12, 2022, 11:35 AM IST

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे 17 सप्टेंबरपासून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार ( Raj Thackeray Maharashtra tour) आहेत. या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे नागपूर मधून करणारा असून सुरुवातीला विदर्भाचा आढावा घेऊन राज ठाकरे यांचा ताफा पुढे सरकेल. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांची खलबत्त सुरू झाली असून, मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेते व सरचिटणीसांची बैठक बोलवण्यात आलेली ( MNS Meeting In Mumbai )आहे. या बैठकीत नेमकी काय खलबत्या होतात काय निर्णय होतात, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.



राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरामिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे ( Raj Thackeray ) त्यांच्या पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासोबतच शिवसेनेसह महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी राज ठाकरेंनी केली ( meeting of MNS regarding Maharashtra tour Raj Thackeray ) आहे. स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 17 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत. या दौऱ्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरू होतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details