महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS Hanuman Chalisa : संदीप देशपांडे, संतोष धुरींच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबणीवर - संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अटकपूर्वी जामीन

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर ( MNS leaders Sandeep Deshpande and Santosh Dhuri ) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणी न झाल्याने संदीप देशपांडे यांच्या अडचणी आणखी वाढले आहे. आता अटकपूर्व जामीन अर्जावर ( Hearing on pre-bail application extended ) सुनावणी होणार आहे. 4 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर ( Shivteerth Raj Thackeray Residence Mumbai ) सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांना चकवून दोन्ही नेत्यांनी पळ काढला होता.

सत्र न्यायालय मुंबई
सत्र न्यायालय मुंबई

By

Published : May 10, 2022, 5:15 PM IST

मुंबई -मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी त्यांच्या ( MNS leaders Sandeep Deshpande and Santosh Dhuri ) अटकपूर्व जामीन अर्जावर आज ( मंगळवारी ) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणी न झाल्याने संदीप देशपांडे यांच्या अडचणी आणखी वाढले आहे. आता अटकपूर्व जामीन अर्जावर ( Hearing on pre-bail application extended ) सुनावणी होणार आहे. 4 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर ( Shivteerth Raj Thackeray Residence Mumbai ) सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांना चकवून दोन्ही नेत्यांनी पळ काढला होता. त्यावेळी महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे दोन्ही नेते फरार आहे.



मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मेचा अल्टिमेटम दिला होता. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन्ही नेत्यांनी कारमधून पळ काढला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. दरम्यान सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यास संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.



मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल कामाला लागली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रांचकडून विशेष पथक रवाना करण्यात आली आहेत. मुंबईसह उरण, कर्जत भागात या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 4 मे रोजी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थाबाहेर ताब्यात घेण्याचा प्रयत्न असताना देशपांडे आणि धुरी पोलिसांना गुंगारा देत निसटले होते. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून देशपांडे पोलिसांच्या रडारवर आहेत.

हेही वाचा -MNS Bala Nandgaonkar : 'भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details