मुंबई:मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र मेळावे घेत आपली ताकद दाखवून दिली. मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची पारंपरिक सभा झाली. यावेळी त्यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. तर बीकेसी येथील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची सभा झाली. या दोन्ही सभांवर आता मनसेकडून टीका करण्यात आली आहे. (MNS On Dasara Melava). मनसेचे आमदार राजू पाटील (raju patil) व प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मजा नाय राव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय की, भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो. अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच. मजा नाय राव." असं म्हणत आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यावर टीका केली आहे.