महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS Bala Nandgaonkar : 'भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही' - एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही

राज ठाकरे यांच्या ( MNS president Raj Thackeray Ayodhya Tour ) आयोध्या दौऱ्याला मात्र खासदार ब्रिजभूषण सिंह ( MP Brijbhushan Singh ) यांचा विरोध अधिक तीव्र होत चालला आहे. याच विरोधात ब्रिजभूषण यांनी आज (मंगळवारी) चक्क हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणत राज ठाकरे यांच्या विरोधात रॅली काढली. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर ( MNS leader Bala Nandgaonkar ) यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

MNS Bala Nandgaonkar
MNS Bala Nandgaonkar

By

Published : May 10, 2022, 3:33 PM IST

Updated : May 10, 2022, 3:41 PM IST

मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची तारीख जवळ येत आहे. पाच जून रोजी राज ठाकरे हजारो कार्यकर्त्यांसह अयोध्या राम जन्मभूमीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या ( MNS president Raj Thackeray Ayodhya Tour ) आयोध्या दौऱ्याला मात्र खासदार ब्रिजभूषण सिंह ( MP Brijbhushan Singh ) यांचा विरोध अधिक तीव्र होत चालला आहे. याच विरोधात ब्रिजभूषण यांनी आज (मंगळवारी) चक्क हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणत राज ठाकरे यांच्या विरोधात रॅली काढली. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. सुरक्षे संदर्भात तेथिल प्रशासनाशी आमचे सातत्याने बोलणे सुरू आहे. सुरक्षेची व्यवस्था देखील पूर्ण झालेली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमचे स्वागत केले आहे. त्यामुळे दौरा निश्चितच होईल. भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर ( MNS leader Bala Nandgaonkar ) यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना मनसे नेते बाळा नांदगावकर

पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक : राज्यात आमचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सभा झाल्या. गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेली पहिली सभा, त्यानंतर ठाण्यात झालेली उत्तर सभा आणि 1 मे रोजी औरंगाबादमध्ये झालेली सभा अशा तीन सभा झाल्या. या सभांचा जनतेवर काय परिणाम झाला ? त्यावर सध्या काय स्थिती आहे ? यावर आजची बैठक होती. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या आजची बैठक महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली आहे.


राज ठाकरे यांच्या विरोधात रॅली :कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्येत येणार याच्या निषेधार्थ त्यांच्या विष्णोहरपूर गावातून रॅली काढली. रॅलीत सहभागी लोक राज ठाकरेंचा निषेध करत उत्तर भारतीयांची माफी मागण्याची मागणी करत होते. सोमवारी कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कालनेमी राक्षसासारखे वर्णन करताना राज ठाकरेंना अयोध्या सीमेवर प्रवेश दिला जाणार नाही, असे म्हटले होते.

हेही वाचा -Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह आक्रमक! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध कायम

Last Updated : May 10, 2022, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details