महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार, म्हणाले- एकत्रित संकटावर मात करता येईल - भारत बायोटेक

"केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की." असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.

हाफकिनला लस निर्मीतीची परवानगी : राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार
हाफकिनला लस निर्मीतीची परवानगी : राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार

By

Published : Apr 16, 2021, 11:12 AM IST

Updated : Apr 16, 2021, 12:40 PM IST

मुंबई : हाफकिनमध्ये कोवॅक्सिन लसीच्या निर्मीतीस मान्यता दिल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. ट्विटरवर एक ट्विट टाकून राज ठाकरेंनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे.

राज ठाकरेंचे ट्विट
राज ठाकरेंचे ट्विट"१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत, ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की." असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.


मुख्यमंत्र्यांनीही मानले आभार
हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ट्विटरवरून दिली होती. राज्याच्या विनंतीचा स्वीकार करत मान्यता दिल्याने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने कोवॅक्सिनच्या निर्मितीली परवानगी दिल्याने हाफकिनमधून मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन होऊ शकते.

हाफकिनला लस बनविण्यास मान्यता
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे. कोवॅक्सिन बनविण्यासाठी १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव कुंटे यांना सांगितले आहे. हाफकिनमध्ये लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासदेखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना काल सांगितले आहे.

Last Updated : Apr 16, 2021, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details