मुंबई -मनसे अध्यक्षराज ठाकरे यांनाही बोर्नचा त्रास झाल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारणत: हिप बोनचा त्रास मणक्यामध्ये असलेल्या नसांवर दबाव आल्याने रक्तपुरवठा कमी झाल्याने होतो. यावर इंडॉस्कॉपी डिस्टिकटॉमी ही शस्त्रक्रिया राज ठाकरे यांच्यावर होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) शस्त्रक्रियासाठी लीलावती रुग्णालयात दाखल ( Lilavati hospital Mumbai ) झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांना हिप बोनचा ( Heap bone ) त्रास होत आहे. या त्रासावर उपचार करण्यासाठी त्यात लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून पुढील तीन ते चार दिवस राज ठाकरे यांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांना अचानक हा त्रास जाणवू लागला. त्यानंतर लगेचच त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात यासंबंधी टेस्ट करून घेतल्या. मात्र पाय दुखीचा त्रास वाढत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे हा आजार ? :माणसाच्या खालून पाचव्या किंवा सहाव्या मणक्यातून खुब्यापासून पायापर्यंत जाणाऱ्या नसांमध्ये दबाव निर्माण झाल्यात त्याचा त्रास जाणवू लागतो. रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पाय किंवा खुबा दुखण्यास सुरुवात होते. मात्र आजाराच्या सुरुवातीलाच काही औषध आणि योग्य व्यायाम करून हा त्रास कमी करू शकतो. यासाठी चार ते सहा आठवडे उपचार करावे लागतात. मात्र तरीही यामध्ये रुग्णाचा त्रास कमी झाला नाही. तर, एक लहानशी शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेत लेझर ट्यूब टाकून त्या नसांवरचा प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत इंडॉस्कॉपी डिस्टिकटॉमी, असे म्हणतात.
आजारामुळे रुग्णाला होणारा त्रास :राज ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी कोविडचे निदान झाले होते. काही वेळा कोविड नंतर एरास्कुलर नेक्रोसिसमुळे हीप बोनचा रक्त पुरवठा कमी होतो. त्यामुळे हीप बोनचा वरचा भाग खडबडीत होतो. तो भाग वरच्या गुळगुळीत भागाशी घर्षण झाल्याने पाठ, कंबर किंवा पायात दुखण्याचा त्रास सुरू होतो. एखाद्या वेळेस हा त्रास वाढला तर हीप बोन रिप्लेसमेंट देखील करावे लागू शकते. साधारणतः 30 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये हा आजाराचा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. मात्र राज ठाकरे ज्याप्रमाणे होणारा त्रास सांगत आहेत. त्यामध्ये हिप बोन रिप्लेसमेंट करण्याची आवश्यकता फारच कमी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कोर डिकम्प्रेशन ही सर्जरी होण्याची शक्यता आहे. या सर्जरीत जिथे रक्त पुरवठा कमी होतो. त्या ठिकाणी हीप बोन वर बारीक छिद्र करून रक्तदाब वाढवला जातो. जेणेकरून रक्तपुरवठा सुरळीत होऊन रुग्णाला आराम मिळेल, अशी माहिती ऑर्थोपेडिक सर्जन तज्ज्ञ डॉ. ओम पाटील यांनी दिली आहे. राज ठाकरे यांना सांयटिका हा त्रास असण्याची शक्यता डॉक्टर ओम पाटील यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. अधिक तर स्टिरॉइड किंवा पोस्ट कोविडमुळे हा आजार होत असल्याचे मत डॉक्टरांच आहे. यामध्ये कोर डीकम्प्रेशन ऑफ हिप सर्जरी, हिप रिसर्फसिंग सर्जरी, हिप रिप्लेसमेंट सर्जरी या तीन प्रकारच्या सर्जरी केल्या जातात.
शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी :या आजारांमध्ये खुब्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. खूप वेदना होत असतात. यामुळे अनेक वेळा लंगडत चालावे लागते. किंवा ज्या पायावर अधिक त्रास होतो त्या ठिकाणी दबाव कमी दिला जावा यासाठी प्रयत्न असतो. चालताना किंवा अधिक वेळ उभ राहिल्यामुळे रुग्णाला त्रास जाणवत असतो. हा आजार खेळाडू किंवा शरीराची अधिक हालचाल होणाऱ्या लोकांना अधिक प्रमाणात होतो. या शस्त्रक्रियेनंतर जवळपास दोन दिवस रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते. मात्र दोन ते तीन आठवडे रुग्णाला घरी काळजी घ्यावी लागते. कोणतीही धावपळ करता येत नाही. चालताना विशेष काळजी घेऊन चालावे लागते. जिने चढ-उतर करू नये, असा सल्ला डॉक्टरांकडून या आजारानंतर देण्यात येतो. मात्र त्यानंतर रुग्ण सर्वसामान्य आयुष्य सहज वावरू शकतो. मात्र अनेक वेळा रुग्णाला मांडी घालून बसणे किंवा भारतीय पद्धतीने शौचास बसणे, तसेच खुर्चीवर पायावर पाय ठेवून बसणे यामध्ये मोठा त्रास होतो. सहसा अशा पद्धतीने बसने टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन आठवड्याचा औषध उपचारानंतर रुग्णाच्या खाण पानावर कोणते बंधने येत नाहीत.
हेही वाचा -शारीरिक वजन घटवायचे असून सामाजिक वजन वाढवायचे आहे - राज ठाकरे