महाराष्ट्र

maharashtra

Balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सल्लागाराची नेमणूक; निविदा मागवल्या

By

Published : Feb 27, 2022, 1:16 PM IST

महापौर बंगल्याच्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरु ( Balasaheb Thackeray Memorial ) आहे. त्यासाठी आता सल्लागार नेमण्यात येणार आहे. एमएमआरडीएने 24 मार्चपर्यंत निविदा मागवल्या ( MMRDA invites tenders Balasaheb Thackeray Memorial ) आहेत.

Balasaheb Thackeray Memorial
Balasaheb Thackeray Memorial

मुंबई - दादर येथील तत्कालीन महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम वेगाने ( Balasaheb Thackeray Memorial ) सुरु आहे. बाळासाहेबांच्या दृकश्राव्य चरित्राचे संग्रह करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी 24 मार्चपर्यंत एमएमआरडीएने निविदा मागवल्या ( MMRDA invites tenders Balasaheb Thackeray Memorial ) आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी दादर येथील तत्कालीन महापौर निवासस्थानी स्मारक उभारले जात आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. युद्धपातळीवर हे सुरू असून, आतापर्यंत 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. स्मारकात नाविन्यपूर्ण संग्रहाच्या रचनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. एमएमआरडीएने यासंदर्भात निर्णय घेतला असून, याकरिता निविदा मागवल्या आहेत. इच्छुकांना येत्या 24 मार्च पर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बाग बगीचा तयार करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कामे पहिल्या टप्प्यात केली जातील. तर, दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग, प्रोजेक्शन, कथा, गोष्टी सांगणे, चित्रपट व्हर्चुअल रियालिटी, व्हिडीओ व्हिज्युएल आणि तांत्रिक घटक आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी सल्लागार निवडीचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

हेही वाचा -IT Raid On Yashwant Jadhav : तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details