मुंबई-विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून वेगवान राजकीय हालचाली होत असल्याचे ( Maharashtra All Party Mlas In Mumbai ) दिसत आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक ( meeting on Legislative council election ) होणार आहे. या बैठकीत सर्व आमदारांना मार्गदर्शन आणि मतदानाबाबत च्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP leader Jayant Patil ) यांनी शनिवार मुंबईत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या सर्व आमदारांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच या सभेला राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 22 उमेदवारांची महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधानपरिषद निवडणुकीच्या ( Vidhan Parishad Election 2022 ) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय ( Maharashtra All Party Mlas In Mumbai Luxury Hotel ) निवडला आहे. या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरीही मत फुटण्याची भीती कायम आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ट्रायडंट हॉटेलमध्ये राहणार-राज्यसभा निवडणुकीत आमदारांना दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला तोंडघशी पडावे लागले आहे. सर्व आमदारांना एकत्र बांधून ठेवल्यानंतरही महाविकास आघाडीला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांसाठी महाविकासआघाडी सरकारमधल्या घटक पक्षांनी आणि विरोधकांनी आपापल्या आमदारांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल वेस्ट इनमध्ये ठेवले आहे. तर, भाजपने ताज हॉटेलचा आधार निवडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे.