महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना आमदार सुनिल राऊत अपक्ष लढणार; किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या

संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सोमय्या यांच्याविरोधात ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेना आमदार सुनिल राऊत

By

Published : Mar 28, 2019, 1:20 PM IST

Updated : Mar 28, 2019, 3:14 PM IST

मुंबई- ईशान्य मुंबईतून कोणाला तिकीट द्यायचे याचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसैनिकांनी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना प्रचंड विरोध केल्याने भाजपने अद्यापही येथील उमेदवाराची घोषणा केली नाही. आता मात्र संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.

शिवसेना आमदार सुनिल राऊत

भाजपने किरीट सोमय्या यांना तिकीट दिल्यास त्यांच्याविरोधात आपण अपक्ष लढणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Last Updated : Mar 28, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details