महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLA Sanjay Shirsat : मंत्रीपद न मिळाल्यामुळे मी नाराज असल्याच्या केवळ अफवा ; आमदार संजय शिरसाट - आमदार संजय शिरसाट नाराज असल्याच्या अफवा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असून ते लवकरच वेगळा विचार ( MLA Sanjay Shirsat not getting ministerial post ) करतील, अशा पद्धतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. मात्र अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नसल्याचे संजय शिरसाठ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले ( MLA Sanjay Shirsat unhappy rumors ) आहे.

MLA Sanjay Shirsat
आमदार संजय शिरसाट

By

Published : Sep 16, 2022, 1:34 PM IST

मुंबई -शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटहे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असून ते लवकरच वेगळा विचार MLA ( Sanjay Shirsat not getting ministerial post ) करतील, अशा पद्धतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अनुपस्थिती दर्शवल्याने या चर्चांना अधिक उधान आले होते. मात्र अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नसल्याचे संजय शिरसाठ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले ( MLA Sanjay Shirsat unhappy rumors ) आहे.



केवळ प्रसार माध्यमांमधून अफवामी शिंदे गटासोबत जाताना कोणत्याही मंत्रीपदाचा विचार केला नव्हता. केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून मी त्यांच्यासोबत गेलो, त्यामुळे मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज ( MLA Sanjay Shirsat unhappy ) आहे, अशा अफवा केवळ प्रसार माध्यमांमधून पसरवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शिरसाट यांनी सांगितले.



मंत्रीपद मिळाले नाही तरी शिंदे गटासोबतचआपल्याला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्येही जर मंत्री पद (ministerial post) मिळाले नाही, तरीही आपण नाराज होणार नाही. कारण शिंदे गटासोबत आलेल्या आणि आधीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या नेत्यांना मंत्रीपद देणे आवश्यक होते, ही गोष्ट आपल्यालाही मान्य आहे. त्यामुळे आपण शिंदे यांच्यावर नाराज नाही, त्यांच्या गटासोबतच कायम राहू असेही शिरसाट यांनी सांगितले.


वेदांता प्रकल्पात तत्कालीन सरकारच्या वेगळ्याच अपेक्षाराज्यातील वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या संदर्भात शिरसाठ यांना विचारले असता, त्यांनी यासंदर्भात आपल्याकडे अतिशय गंभीर माहिती असून तत्कालीन सरकारमधील काही लोकांचा वेगळ्या अपेक्षा या प्रकल्पाकडून होत्या. त्यामुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही, असा गंभीर आरोप यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details