मुंबई - शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळावा, यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot agitation on sugercane FRP ) यांनी विधान भवन परिसरामध्ये आंदोलन केले. उसाच्या मोळ्या आणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी ( Sugercane FRP ) मिळावा, शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांना उसाची मोळी देऊन सरकारचा निषेध करणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा -ED Raids Kurla Area : नवाब मलिक प्रकरणात ईडीची कुर्ला परिसरात छापेमारी
शेतकऱ्याला एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, तसेच आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान भवन परिसरामध्ये उसाची मोळी आणून आंदोलन केले. उसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपी मिळाला पाहिजे. मात्र, राज्य सरकार एफआरपी 2 टप्प्यांमध्ये देणार असे सांगत आहे. तसेच, एफआरपी दोन टप्प्यात दिला जावा, असे केंद्र सरकारचे पत्र असल्याचे भासवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेला. मात्र, केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राज्य सरकार तोंडावर पडले. त्यामुळे, सरकारने शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी द्यावा. तसेच, राज्यामध्ये उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्या सर्व ऊसाची खरेदी होईपर्यंत गाळप बंद करू नये, अशी मागणी राज्य सरकारला गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एक रक्कमी एफआरपीसाठी उसाची मोळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
मोठे जनआंदोलन उभारणार - शेट्टी