मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदाराने आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले. आरोप करणाऱ्यांनी राजीनामा द्या, मी सुद्धा देतो. आपण निवडणुकीला सामोरे जाऊ, जनता जो कौल देईल तो मान्य असेल. हिम्मत राजीनामा द्या, MLA Aditya Thackeray असे थेट आव्हान दिले. तसेच एका मंत्रीपदासाठी काय काय करावे लागते. त्या सर्व आमदारांची मला कीव वाटते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आणि बंडखोर नेते यांच्यात जोरदार जुंपली आहे. बुधवारी शिंदे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये झटापटी झाली. यावेळी आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्या. आजही शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पारवा MLA Aditya Thackeray आंदोलन करत आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले.
आम्हाला शिव्या दिल्यावर मंत्रिपद मिळतील आदित्य ठाकरे म्हणाले की, एका मंत्रिपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती आणि काय काय करावे लागत आहे. जी स्क्रिप्ट दिलीय, त्याप्रमाणे त्यांना वागावे लागत आहे. मला त्यांची कीव वाटते. आधी गद्दारी केली नसती तर बिचाऱ्यासारखे उभे राहावे लागले नसते, असा पलटवार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे MLA Aditya Thackeray यांनी केला. गेल्या 40 वर्षात कोणत्या मुख्यमंत्र्यांनी खाती सोडली नसतील अशी खाते आम्ही या लोकांना सोडली. त्यांना सर्व काही दिले. मात्र त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आज पायऱ्यावर उभे आहेत. त्या 40 लोकांसोबत विश्वासघात झाला आहे. त्यांना काय काय गळ्यात घालून आमच्यासाठी उभा केले जात आहे. आम्हाला शिव्या दिल्यावर मंत्रिपद मिळतील हे आजचे चित्र आहे, असा चिमटा काढला.