महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLA Abu Azmi : घर को आग लगी है घर के चिराग से; अबू आझमींचा शिवसेनेला टोला

विधानसभा अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker Election ) निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राहूल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाने ( Socialist Party ) तटस्थ भूमीका घेत कोणालीही मतदान केले नाही. त्यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी ( MLA Abu Azmi ) यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेला टोला लगवला आहे. घर को आग लगी है घर के ही चिराग से अशी शायरी करत त्यांनी शिवसेनेवर ( Shiv Sena ) निशाना साधला आहे.

Abu Azmi
अबू आझमी यांची प्रतिक्रिया

By

Published : Jul 3, 2022, 5:31 PM IST

मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) तसेच भाजपची आज अग्निपरीक्षा होती. विधानसभा अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker Election ) आजच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांना १६३ मत मिळाली. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते भेटली. या अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे ( Socialist Party ) नेते, आमदार अबू आझमी ( MLA Abu Azmi ) यांच्या पक्षाची दोन्ही मते कुणालाही दिली नाही. त्यांनी सभागृहात उपस्थिती दाखवली, परंतु त्यांनी कोणालाही मतदान न करता ते तटस्थ राहण्याची भूमीका घेतली.

घर को आग लगी है घर के चिराग से; अबू आझमींचा शिवसेनेला टोला

हेही वाचा -Aaditya Thackeray On Rebel MLA : कसाबला एवढी सुरक्षा नव्हती, जेवढी बंडखोर आमदारांना - आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

सध्याच्या परिस्थितीत ज्या पद्धतीत राजकारण सुरू आहे, त्याविषयी ते म्हणाले, हा देश संविधानाने चालला पाहिजे. देशामध्ये संप्रदायिक तणाव पसरवून हिंदू- मुसलीमांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम शिवसेनेने केल आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद यांची नावे बदलली गेली आहेत. याची आवश्यकता काय होती? सरकार पडण्याअगोदर घेतलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेला वाटले होते की, या निर्णयाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी विरोध करतील. अशी रणनीती त्यांची होती. याचा तीव्र निषेध करत अबु आझमी ( Abu Azmi ) यांनी केला. एका बाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला दरी, समजत नाही जायचे तर कुठे जायचे. तसेच शिवसेना पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले की घर को आग लगी है घर के ही चिराग से अशी शायरी करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.

हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case : एनआयए पथकासह अमरावती पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details