मुंबई - मुंबईतील मुलुंड परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कार्यालयात बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची चोरी करण्यात आली ( Mulund One Crore Robbed ) आहे. ही चोरी कार्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला ( One Crore Robbed Case Register ) आहे.
Mumbai Crime News : मुलुंडमध्ये थरार, बंदुकीचा धाक दाखवत एक करोड लुटले - मुलुंड मध्ये एक करोड रुपयांची चोरी
मालाड परिसरात एक थरारक घटना समोर आली ( Mulund One Crore Robbed ) आहे. बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Mumbai Crime News
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, चार जण एका कार्यालयात घुसतात आणि बंदुकीच्या धाकाने तेथे असणाऱ्या दोघांना धमकवल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांनी तेथील तब्बल एक कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. या चोरट्यांनी आपल्या तोंडावर मास्क घातल्याने चेहरे दिसत नव्हते. पोलिसांनी याप्रकरणात तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated : Feb 3, 2022, 7:59 AM IST