मुंबई -संभाजीनगर येथील विमानतळाला 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे नाव देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृतीच्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा आठ जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे - रामदास आठवले
आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये. मात्र औरंगाबादमध्ये अजंठा आणि एलोरा या लेणी आहेत. अजंठा एलोरा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक औरंगाबादला येतात. आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या अजंठा एलोरा लेणीचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे आठवले यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे नामकरण करण्याबाबत अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांना पाठवले आहे. आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये. मात्र औरंगाबादमध्ये अजंठा आणि एलोरा या लेणी आहेत. अजंठा एलोरा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक औरंगाबादला येतात. आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या अजंठा एलोरा लेणीचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे आठवले यांनी सांगितले.