मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ( Assembly Speaker Election ) हात वर करून मतमोजणी करुन होणार असल्याने कदाचित भाजपला यात घोडेबाजार करता येणार नाही. हे त्यांना दुःख वाटत असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना लगावला ( Jayant Patil Criticized BJP ) आहे.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत घोडेबाजार करता येणार नसल्याचे भाजपला दु:ख : जयंत पाटील जनतेच्या दृष्ठीने चांगला निर्णय
राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करुन होणार आहे. हे दुःख भाजपला वाटत असेल. लोकशाही, पारदर्शक व महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
राज्यपालांकडे धाव घेणं दुर्दैवी
या निर्णयाच्या विरोधात भाजपचे लोक राज्यपालांकडे धाव घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. इथून पुढे अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन उमेदवाराला पाठिंबा देत होणार आहे. पुढील काळासाठी देखील हीच पद्धत कायम राहील. याचे भाजपला दुःख वाटण्याचे कारण काय? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.