महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Union Budget : 'पाच राज्यांच्या निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकार बजेट सादर करेल' - जयंत पाटील अर्थसंकल्प

शेतकरी विरोधी प्रतिमा मोदी सरकारची तयार झाली आहे. ती पुसण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून मोदी सरकारचा असणार असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त मंत्रालया शेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Jan 30, 2022, 1:29 PM IST

मुंबई - पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन केंद्र सरकार एक तारखेचे आर्थिक बजेट सादर करेल. तसेच शेतकरी विरोधी प्रतिमा मोदी सरकारची तयार झाली आहे. ती पुसण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून मोदी सरकारचा असणार असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त मंत्रालया शेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या देखील हजर होत्या.

'पाच राज्यांच्या निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकार बजेट सादर करेल'

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला दुजाभाव

देशात जेव्हा पासून मोदी सरकार आल आहे. तेव्हापासूनच महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात हवी तेवढी तरतूद केली जात नाही. केंद्रीय योजनांमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राला मनमोहनसिंग यांचे सरकार असताना मदत केली जात होती. ती मदत मोदी सरकार आल्यानंतर होताना दिसत नाही. केंद्रीय योजनांमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा मोठा असला पाहिजे मात्र तसही मोदी सरकार मध्ये दिसत नाही. इंधनाचे दर अंतरराष्ट्रीय बाजार पेठ प्रमाण केल्यास सामान्य नागरिकाला नक्कीच दिलासा मिळेल असेही या वेळी जयंत पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details