महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वैद्यकीय प्रवेश प्रकरण; 'सरकार काढणार अध्यादेश, सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित'

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही वैद्याकीय प्रवेशात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

By

Published : May 17, 2019, 2:23 PM IST

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई- वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. हा अध्यादेश राज्यपालांच्या सहीसाठी पाठवण्यात येईल. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वैद्यकीय प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. न्यायालयाने प्रवेश नाकारल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार होते. मात्र १६ क नुसार सर्वांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


एकूण अॅडमिशनच्या जागा वाढवून मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे ३१ तारखेपर्यंत प्रवेश प्रक्रिया वाढवण्याची परवानगी द्यावी, यासाठी विनंती अर्ज केला आहे.
मराठा आरक्षण लागू झाल्याने ज्या ओपनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली नाही, त्यासाठी खासगी महाविद्यालयात अॅडमिशन घेताना जी फी भरावी लागते, ती राज्य सरकार भरेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्य मंत्रीमंडळाने हा सर्वोच्च निर्णय घेतला आहे, त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details