महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajya Sabha Election : महाविकास आघाडी जिंकेल; बाळासाहेब थोरात यांचा विश्वास - राज्यसभा निवडणुकीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि मविआ ठाम राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना - भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच जिंकेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

balasaheb thorat
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

By

Published : Jun 3, 2022, 5:51 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि मविआ ठाम राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना - भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच जिंकेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली.

अपक्षांची काळजी घेतली - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या दहा जूनला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून मविआने प्रयत्न केले. भाजपने तिसरा उमेदवार मागे घेण्यासाठी मनधरणी केली. परंतु, भाजप ठाम राहिल्याने चर्चा निष्फळ ठरली. यामुळे भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे. काही अपक्ष भाजपकडे असले तरी बहुसंख्य अपक्ष हे महाविकास आघाडीसोबत आहेत. राज्यसभेची चौथी जागा देखील महाविकास आघाडी जिंकेल, हे निश्चित आहे. भाजपकडील काही अपक्ष आम्हाला मदत करतील. बहुसंख्य अपक्ष आमच्याकडे असून अपक्षांची आम्ही व्यवस्थित काळजी घेतली आहे. त्यामुळे आम्ही विजयी होणार आहोत, असा विश्वास मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जागा लढवू आणि जिंकू - राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. भाजपला दोन जागा मिळणार आहेत. ते त्यांचा कोटा पूर्ण करत आहेत. महविकास आघाडी चौथी जागा निवडून आणणार आहे. आम्ही भाजप सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीकडून दिलेली ऑफर त्यांनी मान्य केली असती तर नक्कीच आनंद झाला असता. निवडणूक सुरू झाली की अनेक बाबी समोर येतात. यासाठी ज्येष्ठांनी मिळून निर्णय घ्यायला हवा होता, त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन सहाव्या जागेबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपने आमची ऑफर नाकारली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी आता निवडणूक होईल. ही जागा शिवसेनेला गेली असली तरी आम्ही सर्व जण या जागेसाठी मदत करणार आहोत. त्यामुळे सहावी जागा आम्ही लढवू आणि ती जिंकू देखील, असे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details