मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council elections ) इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांचा प्रभाव वाढला आहे. भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री होईल, ( Future Chief Minister of Prahar ) असा दृढ विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू ( Minister of State Bachchu Kadu ) यांनी व्यक्त केला. विधान भवनात मंत्री कडू प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या आमदार पक्षांचे मोठ्या प्रमाणात वजन वाढले. यावरुन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टोलेबाजी केली. गेल्या दोन निवडणुकांवर अपक्ष आणि इतर छोट्य पक्षांचा प्रभाव आहे.
Bacchu Kadu : भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री होईल; बच्चू कडू यांना विश्वास - Devendra Fadnavis
विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council elections ) इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांचा प्रभाव वाढला आहे. भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री होईल, ( Future Chief Minister of Prahar ) असा दृढ विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू ( Minister of State Bachchu Kadu ) यांनी व्यक्त केला. विधान भवनात मंत्री कडू प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या आमदार पक्षांचे मोठ्या प्रमाणात वजन वाढले.
येणाऱ्या काळात अपक्ष आणि लहान पक्षांचा प्रभाव असाच राहील. एक दिवस प्रहारचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा, मंत्री कडू यांनी केला. मी नाराज नाही. माझी जन्मभर नाराजी राहणार नाही, मेल्यावरसुद्धा राहणार नाही. पण, जेव्हा नाराजी असेल तेव्हा झटका दिल्याशिवाय थांबणार नाही, असे सूचक विधान केले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा यावेळी केला. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, आवश्यक संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-Sangli Family Suicide : सांगली हादरलं ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या