मुंबई- सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी सहकुटुंब कुर्ला येथे मतदान केले. पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार येणार असून पहिल्या मंत्रिमंडळात आरपीआयला मंत्री पद मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नाराजी असतानाही महायुतीचा प्रचार केला. त्यामुळे आम्हाला सरकारमध्ये धोका होण्याची शक्यता नसल्याचेही अविनाश महातेकर यांनी सांगितले.
सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी केले मतदान हेही वाचा -एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?
विधानसभा निवडणुकीत रिपाईला राज्यात पाच जागा देण्यात आल्या होत्या. यात 5 पैकी 4 जागा निवडून येण्याची आशा राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी व्यक्त केली. राज्यात महायुतीच्या जास्ती जागा येऊन देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येणार असल्याचे मंत्री अविनाश महातेकर म्हणाले.
हेही वाचा -मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क
दरम्यान, मी नेहमीच मतदान करत असून देशासाठी मतदान केले पाहिजे, असे मत महातेकर यांच्या आईंनी व्यक्त केले आहे.