महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्री अस्लम शेख यांच्या अंगरक्षकाला मारहाण - मंत्री अस्लम शेख यांच्या अंगरक्षकाला मारहाण

काँग्रेसचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या अंगरक्षकाला मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये 21 फेब्रुवारी रोजी रात्री एका कार्यक्रमादरम्यान असलम शेख हे त्यांच्या बॉडीगार्ड सोबत गेले असता हा प्रकार झाला.

aslam
मंत्री अस्लम शेख यांच्या अंगरक्षकाला मारहाण

By

Published : Mar 4, 2021, 4:43 PM IST

मुंबई-काँग्रेसचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या अंगरक्षकाला मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये 21 फेब्रुवारी रोजी रात्री एका कार्यक्रमादरम्यान असलम शेख हे त्यांच्या बॉडीगार्ड सोबत गेले होते. त्यावेळी रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या मोटरसायकल हटवण्यासाठी त्यांचे अंगरक्षक कॉन्स्टेबल दिगंबर पानसरे रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी तीन व्यक्तींसोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. रस्त्यावर पार्क केलेल्या मोटरसायकल हटविण्यासाठी कॉन्स्टेबलने संबंधित आरोपींना सांगितले असता अंगरक्षकाला मारहाण कारण्यात आली. यासंदर्भात वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details