मुंबई :काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाची ( Congress Minority Cell ) 26 मार्च रोजी बांद्रा येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री मंत्री असलम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांनी मंचावर हातात खऱ्या तलवारी घेऊन दाखवल्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली ( Mohit Kamboj Demand Action Aslam Shaikh ) आहे. मात्र आपण कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तलवारी घेऊन नाचलो नाही. बांद्रा येथे झालेला कार्यक्रम शीख समुदाय देखील उपस्थित होते. या शीख समाजातील लोकांनी आपल्याला या तलवारी दिल्या असल्याचे स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली ( Aslam Shaikh On Mohit Kamboj ) आहे.
Aslam Shaikh On Mohit Kamboj : तलवार घेऊन आम्ही लोकांमध्ये नाचलो नाही.. अस्लम शेख यांचा कंबोज यांना टोला
काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान ( Congress Minority Cell ) मंत्री असलम शेख आणि वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी हातात खऱ्या तलवारी घेऊन दाखवल्या. याविरोधात भाजप नेते मोहित कंबोज यांनी कारवाईची मागणी केली ( Mohit Kamboj Demand Action Aslam Shaikh ) आहे. त्यावर मंत्री शेख यांनी कंबोज यांना टोला लगावला आहे. आम्ही सार्वजनिक ठिकाणी तलवारी घेऊन नाचलो नाही. मोदीजीही अनेकदा तलवारी दाखवतात, असे ते ( Aslam Shaikh On Mohit Kamboj ) म्हणाले.
मोदीजींनीही अनेकदा तलवारी दाखवल्या : तसेच अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील कार्यक्रमादरम्यान अशा तलवारी दाखवले असल्याची आठवण असलम शेख यांनी मोहित कंबोज यांना करून दिली. दादर येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना असलम शेख यांनी हे स्पष्टीकरण दिले.
मुंबई पोलीस भेदभाव करत नाही हे दाखवावे : सार्वजनिक ठिकाणी खुली तलवार दाखवल्यामुळे 23 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केला होता. आता मंत्री वर्षा गायकवाड, मंत्री असलम शेख आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडून अशाप्रकारे खऱ्या तलवारी दाखवून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता कायदा सुव्यवस्था राखताना भेदभाव केला जात नाही असे दाखवून द्यावे असे आव्हान मुंबई पोलिसांना मोहित कंबोज भारतीय यांनी केले आहे.