मुंबई - मराठा समाजातील नेते आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. नुकतेच संभाजी राजे यांनी राज्य सरकार भूमिका घेण्यात गडबड करते, असं म्हटलंय. यावर राज्य सरकारचे मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा राजकीय खेळ असल्याचे म्हटले आहे. 'दोन्ही बाजूने बोलणारी लोकं असतात, असे ते म्हणाले.
सरकारने निर्णय घ्यावा, हे न्यायालयाचे मत होतं
कॅबिनेटने निर्णय घेतल्यावर अनेकांनी विरोध केला. आता लोक कोर्टात जात आहेत. आर्थिक दुर्बल घटकांमधून आरक्षणाचा लाभ द्या, अशी मागणी केली होती. आता कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे सरकारने सर्वांचे मत घेऊन हा निर्णय घेतला. सरकारने निर्णय घ्यावा, हे न्यायालयाचे मत होते. हा निर्णय ऐच्छिक आहे. फुल प्रूफ प्रस्ताव दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. मात्र मराठा आरक्षण ठिकावं हा आमचा प्रयत्न आहे, असे चव्हाण म्हणाले. दोन्ही बाजूने बोलणारी लोक आहेत. निर्णय घेतला तरी विरोध, करायचा हा त्यांचा राजकीय सूर असतो, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दिल्लीत अघोषीत आणीबाणी