महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसे सुपारीवर चालणारा पक्ष - अनिल परब - मंत्री अनिल परब ऑन मनसे

मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष आहे, असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन झाल्या आता भाजपची घेतली आहे. त्यांचे अस्तित्वच यावर आहे, असेही परब यावेळी म्हणाले.

Minister Anil Parab
अनिल परब

By

Published : Nov 23, 2020, 6:11 PM IST

Updated : Nov 23, 2020, 8:00 PM IST

मुंबई - वीजबिल, शाळांची फी आणि कॊरोना यासह अनेक मुद्द्यांवरून आता मनसेने महाविकास आघाडी सरकारला त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. तर याविषयी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष आहे, असा आरोप केला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन झाल्या आता भाजपची घेतली आहे. त्यांचं अस्तित्वच यावर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

परिवहन मंत्री अनिल परब

लोकसभा निवडणुकीवेळेस टीका आता त्यांच्याबरोबरच

भाजपकडून रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. अगदी कॊरोनापासून ते मुख्यमंत्र्यांवर जमिनी घोटाळ्यासंदर्भातील आरोपापर्यंत. त्यात आता वीजबिलावरून एकीकडे भाजपने तर दुसरीकडे मनसेने सरकारला टार्गेट केले आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. असे झाल्यास ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे का ? असा प्रश्न परब यांना प्रसार माध्यमानी विचारला असता, मनसे सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनसेकडून आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षाच्या सुपाऱ्या घेऊन झाल्या. आता भाजपकडून सुपारी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षावर 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत आरोप केले त्यांच्याबरोबर आता ते चालले आहेत. तेव्हा सुपारी घेणे हेच त्यांचं अस्तित्व आहे असेही ते यावेळी म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाबाबत लवकरच निर्णय

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होते. मात्र कॊरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे अधिवेशन मुंबईतच होणार असून 7 डिसेंबर ही अधिवेशनाची तारीख आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट गडद झाले आहे. तेव्हा अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. याविषयी त्यांना विचारले असता याबाबत लवकरच निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बिझनेस ऍडव्हायझरी समितीशी याबाबत चर्चा सुरू आहे. त्यानुसार याबाबत लवकरच एक बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशन घ्यायचे की ते पुढे ढकलायचे हे ठरेल, असेही ते म्हणाले.

...याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख घेतील

मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीला आता सर्व पक्ष लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कुणालाही ध्यानीमनी नसताना एक वेगळे महाविकास आघाडीचे समीकरण पुढे आले. तेव्हा आता पालिका निवडणुकीतही हेच समीकरण दिसणार का याबाबत सांगताना मात्र परब यांनी सावधपणे उत्तर दिले आहे. शिवसेना हा पक्ष केवळ निवडणुकीसाठी काम करत नाही. तर पालिका निवडणुकीसाठी आम्हाला काही वेगळे काम करण्याची गरज नाही. कारण आमचे काम 365 दिवस सुरू असते. त्यामुळे पालिका निवडणुका आम्ही जिंकूच. तर सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष एकत्रीत लढू का? याचा निर्णय त्या त्या पक्षाचे प्रमुख घेतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा -एमआयएम आमदाराचा ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास नकार; भाजप आमदाराचा पाकिस्तानात जाण्याचा सल्ला

Last Updated : Nov 23, 2020, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details