मुंबई- राफेलप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्यानंतर मात्र मुकेश अंबानींनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसची गोची झाली होती. मात्र, अंबानी यांनी पक्षाला नाही, तर व्यक्तिगत मला पाठिंबा दिल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस प्रदेश कार्यलयात ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्योगपती मुकेश अंबानींचा मला व्यक्तिगत पाठिंबा - मिलिंद देवरा - Congress
मुकेश अंबानींनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसची गोची झाली होती. मात्र, अंबानी यांनी पक्षाला नाही, तर व्यक्तिगत मला पाठिंबा दिल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पाठिंब्याच्या व्हिडिओनंतर भाजपनेही काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसला बिझनेस हाऊसची गरज असल्यानेच काँग्रेस खऱ्या अर्थाने शेटजींचा पक्ष असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ असलेल्या मुकेश अंबानी यांनी एकाएकी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याने देशभरात खळबळ उडाली होती. मात्र याबाबत मिलिंद देवरा यांनी स्पष्टीकरण दिले. मुकेश अंबानी यांनी कोणत्याही पक्षाला नाही, तर व्यक्तिगत स्वरूपात मला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबई या मतदार संघात अनेक बाजारपेठा असल्याने त्याठिकाणी अनेक छोटे मोठे व्यापारी आहेत. तसेच उद्योगपतीही या मतदार संघात राहतात. व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याचेही देवरा यांनी सांगितले.