मुंबई - सर्वसामान्य नागरिकांच्या घराचा प्रश्न हा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा असेल. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुंबईतील नागरिकांना ५०० चौरस फुटाचे घर मिळवून देणे यालाच मी प्राथमिकता देणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मंगळवारी सांगितले.
मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न माझ्यासाठी सर्वात महत्वाचा - मिलिंद देवरा
मुंबईतील नागरिकांना ५०० चौरस फुटाचे घर मिळवून देणे यालाच मी प्राथमिकता देणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मंगळवारी सांगितले
मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर आपल्यावर कोणती महत्त्वाची आव्हाने समोर आहेत, असा सवाल केला असता देवरा म्हणाले, की माझ्यापुढे २९ एप्रिलचे मोठे आव्हान आहे. तर, मुंबईत सर्वात मोठा प्रश्न हा घरांचा बनला आहे. मुंबईतील प्रत्येक ठिकाणी चाळीत, जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीत राहणारे लोक असतील अथवा पोलीस कर्मचारी महापालिका कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचारी असतील त्यांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. तो योग्यरीत्या सोडवला जात नाही. त्यामुळे यांनाही घर मिळवून देणे हे माझ्यासमोर आव्हान आहे. ते मी स्वीकारले आहे.
मुंबईत रहिवाशांना ५०० चौरस फुटाचे घर मिळवून देणे ही माझी प्राथमिकता आहे, माझ्या वडिलांनी दक्षिण मुंबईत भाडेकरू आणि त्यांच्या हक्कासाठी मोठा लढा दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मी मुंबईतील नागरिकांच्या घरांचा प्रश्न हा माझ्या मुख्य अजेंड्यावर घेतला असल्याचेही देवरा म्हणाले.