महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 6, 2022, 10:40 PM IST

Updated : Apr 7, 2022, 10:07 AM IST

ETV Bharat / city

MHADA Colony Issue : आम्ही आता आत्महत्या करायची का ? म्हाडासह बिल्डरच्या जाचाला कंटाळून नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

बिल्डरने मागच्या दोन वर्षांचे भाड थकल्याने आमच्यावर आता उपासमारीची ( builder cheating in MHDA colony project ) वेळ आली आहे. एक तर राहते घरदेखील यांनी घेतले. त्याचेकाम देखील अजून पूर्ण झालेले नाही. त्याचे पैसेदेखील हे लोक देत नाहीत. त्यामुळे सध्या आमच्याकडे आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा आक्रोश मुंबईतील घाटकोपरच्या पंत नगर परिसरातील ( redevelopment of MHDA colony in Pant Nagar ) म्हाडा कॉलनी बिल्डिंग नंबर 25 च्या भारती महाजन यांनी केला आहे.

भाडेकरू
भाडेकरू

मुंबई - म्हाडा आणि बिल्डरच्या जाचाला कंटाळून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. म्हाडाच्या संमतीने बिल्डर लॉबीकडून ( cheating of citizens by builders in Mumbai ) मोठ्या प्रमाणात फसवणूक व पिळवणूक होत असल्याचे सध्या समोर येत आहे. घाटकोपरच्या पंत नगर परिसरातील म्हाडा कॉलनीत ( MHADA colony Pant Nagar ) अनेकांचे कागदपत्रांचे व्यवहारदेखील विकासकांकडून पूर्ण करण्यात आलेले नाहीत.

माझ्या नवऱ्याचा पगार फक्त 8 हजार रुपये आहे. आम्ही सध्या एका भाड्याच्या खोलीत राहत आहोत. त्यातच मतिमंद दिराची जबाबदारी आमच्यावर आहे. माझ्या मुलांचे शिक्षण आहे. इतक्या कमी पगारात भागत नाही. आमची म्हाडाची इमारत जुनी झाल्याचे दाखवत म्हाडाने बिल्डरच्या ताब्यात देऊन ती पुनर्बांधणीसाठी काढली. आमच्या बिल्डरने मागच्या दोन वर्षांचे भाड थकल्याने आमच्यावर आता उपासमारीची ( builder cheating in MHDA colony project ) वेळ आली आहे. एक तर राहते घरदेखील यांनी घेतले. त्याचेकाम देखील अजून पूर्ण झालेले नाही. त्याचे पैसेदेखील हे लोक देत नाहीत. त्यामुळे सध्या आमच्याकडे आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा आक्रोश मुंबईतील घाटकोपरच्या पंत नगर परिसरातील ( redevelopment of MHDA colony in Pant Nagar ) म्हाडा कॉलनी बिल्डिंग नंबर 25 च्या भारती महाजन यांनी केला आहे. या भागातील अनेक इमारती म्हाडाने धोकादायक असल्याचे दाखवत रिडेव्हलपमेंटसाठी काढल्या आहेत. मात्र, फसवणूक होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

आम्ही आता आत्महत्या करायची का ?

'बघून घेऊ' बिल्डर लॉबीकडून धमक्या-मागील अनेक वर्ष लढा देणाऱ्या दिपाली सांगतात की, "पुनर्बांधणीसाठी घर खाली करण्याची नोटीस आम्हाला म्हाडाकडून 2014 साली आली. पण, त्या आधीच या बिल्डर लॉबीकडून घर खाली करण्यासाठी आमच्यावर दबाव सुरू होता. 2016 पर्यंत आमच्या बिल्डिंगचा या बिल्डरने पाच माळ्यांचा सांगाडा बांधून पूर्ण केला. मात्र, आता जवळपास 5 ते 6 वर्ष होत आली. हे काम पुढे सरकलेले नाही. नियमानुसार काम सुरू असेपर्यंत त्या इमारतीतील रहिवाशांना विकासकाने बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत घर भाडे देणे गरजेचे असते. पण मागची दोन वर्षे आमच्या बिल्डरकडून आम्हाला एक रुपयादेखील देण्यात आलेला नाही. पुनर्बांधणीच्या नावाखाली या लोकांनी आमचे राहते घर ताब्यात घेतले. त्यानंतर आम्हाला भाडेदेखील देण्यात आले नाही. आम्हीसुद्धा सामान्य कुटुंबातीलच आहोत. आम्ही जेव्हा आमच्या मागण्यांसाठी या बिल्डर लॉबीकडे जातो त्यावेळी तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्या दिल्या जातात.

म्हाडा, पोलीस प्रशासनाकडून सहकार्य नाही -येथील रहिवासी सांगतात की, बिल्डर लॉबी संदर्भात तक्रारी घेऊन म्हाडाकडे जातो, तेव्हा म्हाडाचे अधिकारी पूर्णपणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. म्हाडातले हे सर्व अधिकारी आमचे म्हणणेदेखील ऐकून घेत नाहीत. आम्हाला धमक्या येतात. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो तर तिथूनदेखील आम्हाला सहकार्य मिळत नाही, असे सांगतात. 'हा सिविल मॅटर आहे. आम्ही तक्रार घेऊ शकत' अशी उत्तरे दिली जात असल्याचे सांगितले जाते.

यासंदर्भात आम्ही संबंधित विकासकांशी अजित जैन व नवीन जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्याबाबत त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर येथे अपडेट माहिती दिली जाईल.

विकासकांची प्रतिक्रिया - यासंदर्भात आम्ही संबंधित विकासकांशी (बिल्डर) अजित जैन व नवीन जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, "आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या धमक्या देण्यात आलेल्या नाहीत आम्ही दोघेजण संपूर्ण काम सांभाळतो. आमच्या दोघांपैकी कुणाकडूनही जरी धमक्या दिल्या गेल्या असतील तर त्यांनी ते स्पष्ट करावे."

हेही वाचा-Mumbai Omicron Cases : मुंबईत 'ओमायक्रॉन'चे 99 टक्के; तर एक कापा, एक XE व्हेरियंटचा रुग्ण

हेही वाचा-Keshav Upadhyay Press conference : जिल्हा परिषदेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तरी पालकमंत्री गप्प का? - केशव उपाध्याय

हेही वाचा-Swami Prakhar Maharaj Case: संत प्रखर महाराज लैंगिक शोषण प्रकरण: बचाव करत पीडित शिष्येचे कुटुंबावरच आरोप

Last Updated : Apr 7, 2022, 10:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details