मुंबई- महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत ( Maharashtra Budget 2022 ) आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी ( Agri schemes in budget 2022 ) विविध योजना जाहीर केल्या ( Ajit Pawar Budget announcements ) आहेत.
- पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
- हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल.
- खरिप व रब्बी पणन हंगाम शेतमाल खऱेदी अंतर्गत विक्रमी खरेदी सोसायट्यांचे संगणकीकरण करुन कोअर बँकिंगद्वारे जोडण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाला 406 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा-Nana Patole : ...तर भाजपला दोन खासदारांचा पक्ष होण्यास वेळ लागणार नाही -नाना पटोले