मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (12 सप्टेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द-नेरुळ स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
- खालील स्थानकांदरम्यान असेल मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकावर थांबणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ रेल्वे स्थानका दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील.
हेही वाचा -साकीनाका बलात्कार प्रकरण : एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे