मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबर, 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळे अप दिशेकडील जाणाऱ्या धिम्या मार्गावरील कळवा आणि मुंब्रा येथे लोकल थांबणार नाही.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉग कालावधी पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
दहा तासांचा मेगाब्लॉक