मुंबई चक्काजाम करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार - वंचित बहुजन आघाडी लेटेस्ट न्यूज
विधासभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मुंबईत वंचित बहुजन आघाडीची सभा मंगळवारी होत आहे. या सभे बाबत मेसेज समाज माध्यमातून सर्वत्र फिरत आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांची मुंबईत सभा होत आहेत. मंगळवारी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमय्या मैदानावर ऐतिहासिक सभा घेणार असल्याची चर्चा समाज माध्यमातून होत आहे. मुंबईतल्या ३६ विधानसभा जागांसाठी ही ऐतिहासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये लाखोच्या संख्येत उद्या मुंबईमध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. उद्या मुंबई चक्काजाम करू. इतिहास सभा लक्षात ठेवेल असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी