राज ठाकरेंच्या सभांबाबत काय म्हणाले शरद पवार...
कोल्हापूर -मोदी-शहा हे देशासाठी घातक आहेत, हे सर्वांना सांगायचा एककलमी कार्यक्रम राज ठाकरे यांचा आहे. जे चुकीचे चालले आहे, ते प्रभावीपणे मांडतात. आपल्या भाषणांमध्ये उदाहरणांसह जे मुद्दे राज ठाकरे दाखवत आहेत, ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या या मांडणीचा नक्कीच फायदा होणार आहे. मात्र, राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केले. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर..
नवनीत राणांचा खासदार अडसूळांवर आरोप..
अमरावती - लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांनी यावर्षी प्रचार सुरू झाल्यापासून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. गेल्या १५ दिवसांत २ प्रचार सभांमध्ये २ वेळा नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर काही लोकांचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे अमरावती मतदारसंघात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..
राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चावरुन निवडणूक आयोगाची कोंडी
सोलापूर - ना उमेदवार...ना प्रचार फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा समाचार अशाप्रकारचे वर्णन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे करावे लागेल. निवडणूक प्रक्रियेतल्या या नव्या प्रयोगामुळं जितकी डोकेदुखी भाजपची वाढली आहे, त्यापेक्षा जास्त निवडणूक आयोगाची यामुळे कोंडी झाली आहे. कारण, राज ठाकरे कुणाला मत द्या हे सांगत नाहीत किंवा त्यांचा उमेदवारही नाही. मग त्यांच्या या भव्य सभांचा खर्च कुठल्या उमेदवाराच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर..
मुख्यमंत्री सभास्थळी पोहचले ३ तास उशीराने...
हिंगोली - जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती. या सभेत मुख्यमंत्री सभास्थळी ३ तास उशिराने पोहोचले. उशिराने मुख्यमंत्री आल्याने आयोजकांवर खुर्च्या गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळाले. वाचा सविस्तर..
निलेशच्या केसालाही धक्का लागला तर..
रत्नागिरी - निलेशच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा, असा थेट इशारा नारायण राणे यांनी विरोधकांना दिला. निलेश राणेंच्या प्रचारसभेत ते जाकादेवी येथे बोलत होते. राणे म्हणाले की, तो प्रामाणिकपणे काम करतोय. खासदार नसला तरी गेली ५ वर्षे तो रत्नागिरीत कार्यरत आहे. वाचा सविस्तर..
भाजप खोटारडा आणि हीन मानसिकतेतून तयार झालेला पक्ष - सावंत
औंरगाबाद - भाजप हा खोट्या लोकांचा पक्ष आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पदवीधर असल्याचे प्रतिज्ञापत्र नमूद केले होते. मात्र, यावेळी त्यांनी १२वी उतीर्ण असल्याचे नमूद केले आहे. यावरून सावंतानी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. वाचा सविस्तर..
'उदयनराजेंच्या दहशतीला घाबरुन शरद पवारांनी त्यांना लोकसभेची दिली उमेदवारी'
सातारा - शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या दहशतीला घाबरुन त्यांना उमेदवारी दिल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पवारांनी मनापासून उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व त्यांचे उमेदवार उदयनराजे या दोघांवरही निशाणा साधला. शिवसेना-भाजपच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर..
आचारसंहितेची ऐशीतैशी..
हिंगोली - लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठी रणधुमाळी सुरू आहे. अशाच स्थितीत आखाडा बाळापूर येथे भाजप -शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. सभा संपल्यावर वाहने घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना हातोहात पैसे वाटप होत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. वाचा सविस्तर..
तू ठरवलसं तर मी बी ध्यानात ठेवलंय..
कोल्हापूर - राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना निवडणुकीत विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घेतला आहे. 'आमचं ठरलंय' हे वाक्य गेल्या महिन्याभरापासून सतेज पाटील यांच्या गटातून जिल्ह्यात चर्चेत आले आहे. याचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'तू ठरवलसं तर मी बी ध्यानात ठेवलयं' असे म्हणत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता टोला लगावला. ते पेठवडगाव येथील राजू शेट्टींच्या प्रचार सभेत बोलत होते. वाचा सविस्तर..