महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'माथेरानची राणी' वर्ष अखेरीस रुळावर; चाचणी यशस्वी

यंदा मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झालेल्या रुळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन सेवा नव्याने सुरू होणार आहे.

matheran train
माथेरान रेल्वे

By

Published : Dec 26, 2019, 8:00 AM IST

मुंबई- यंदा मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झालेल्या रुळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन सेवा नव्याने सुरू होणार आहे. अमन लॉज ते माथेरानदरम्यान रिकाम्या मिनी ट्रेनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी पार पडली असून येत्या दोन दिवसात माथेरानची राणी रुळावर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

माथेरानची मिनी ट्रेन लवकरच रुळावर

हेही वाचा -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे

यंदा पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका या भागातील रेल्वेला बसला होता. नेरळ ते माथेरान दरम्यानचा रेल्वे रूळ 22 ठिकाणी नादुरुस्त झालेला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने मिनी ट्रेनची सेवा बंद केली होती. माथेरान स्थानक परिसरात मिनी ट्रेनच्या देखभालीसाठी पीट लाईन उभारण्यात आली आहे. या पीट मार्गिकेमुळे माथेरानमध्येच मिनी ट्रेनची देखभाल दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेनच्या फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. त्यासाठीच मिनी ट्रेनची चाचणी बुधवारी घेण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details