महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'प्लास्टिक विरोधी कारवाईचे धिंडवडे'.. होळी निमित्त प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री - मुंबई

जून २०१८ पासून राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानुसार मुंबई महापालिकेने प्लास्टिक विरोधात मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत 16 लाख 23 हजार 342 दुकानांना भेटी देऊन 87 हजार 939 किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

Massive sale of plastic bags for Holi
होळी निमित्त प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री

By

Published : Mar 9, 2020, 9:23 AM IST

मुंबई -राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्यावर त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. त्यासाठी प्लास्टिक जप्त करून करोडो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र तरिही होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने पालिकेच्या प्लास्टिक विरोधी कारवाईचे धिंडवडे निघाल्याचे चित्र मुंबईत दिसत आहे.

होळी निमित्त प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री...

हेही....राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी?

जून २०१८ पासून राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानुसार मुंबई महापालिकेने प्लास्टिक विरोधात मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत 16 लाख 23 हजार 342 दुकानांना भेटी देऊन 87 हजार 939 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. 4 कोटी 89 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून दंड न भरणाऱ्या 668 दुकानांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा....जागतिक महिला दिन : राज्य महिला आयोगाकडून महिलांविषयक कायद्यांबाबत 5000 पुस्तिकांचे होणार वाटप

मुंबई महापालिकेने प्लास्टिक विरोधात इतकी मोठी कारवाई करूनही त्याचा काहीही परिणाम दुकानदारांवर झालेला दिसत नाही. होळी आणि धुळीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या विकल्या जातात. ५० ते १०० पिशव्या ५ ते १० रुपयात विकल्या जातात. या पिशव्यांमध्ये पाणी भरून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांवर मारले जाते. या पिशव्या प्लास्टिक बंदी असताना आताही विकल्या जात असल्याने सरकार आणि महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी कारवाईचे धिंडवडे निघाल्याचे चित्र या निमित्ताने शहरात दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details