महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मार्ड' डॉक्टरांचा संप मागे; राज्यातील पूरपरिस्थिती पाहता घेतला निर्णय

राज्यातील पूरस्थिती पाहता, रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी 'मार्ड' डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मात्र, डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारने विचार करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

maard-doctors-call-off-protest-decision-was-taken-looking-at-flood-situation-in-state

By

Published : Aug 8, 2019, 10:36 AM IST

मुंबई- राज्यातील पूरस्थिती पाहता, रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मात्र, डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारने विचार करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

'मार्ड' डॉक्टरांचा संप मागे; राज्यातील पूरपरिस्थिती पाहता घेतला निर्णय

वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांनी, मार्ड डॉक्टरांचा मागण्यांवर शासन सकारात्मकपणे विचार करत आहे, असे सांगितले. तसेच, येत्या काही दिवसांत डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण होतील अशी ग्वाही देत, लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा संप मागे घ्यावा, असे डॉ. लहाने यांनी आवाहन केले. त्यावर मार्ड संघटनेने राज्यातील पूरपरिस्थितीचा विचार करत हा संप तूर्तास मागे घेतला.

परंतु, येत्या काही दिवसात शासनाने आमच्या मागण्यांवर विचार केला नाही, तर पुन्हा संप पुकारु, असे मार्ड डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

  • मार्ड डॉक्टरांनी केलेल्या मागण्या :

* नॅशनल मेडिकल बिल रद्द करावे.
* वेतनवाढ आणि वाढीव रजा मिळावी.
* डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी.


या आणि इतर विविध मागण्यांसाठी मार्ड डॉक्टरांनी संप केला होता, जो आता मागे घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details